अर्थ मंत्रालय

वस्तू सेवा कर लागू झाल्यानंतर एप्रिलमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल जमा

Posted On: 01 MAY 2019 3:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 मे 2019

 

एप्रिल 2019 मध्ये 1 लाख 13 हजार 865 कोटी रुपयांचा एकूण वस्तू सेवा कर महसूल झाला. यापैकी केंद्रीय महसूल वाटा 21 हजार 163 कोटी, राज्यांच्या महसूल 28 हजार 801 कोटी, 54 हजार 733 कोटी रुपये आंतरराष्ट्रीय महसूल (आयातीवरील 23 हजार 289 कोटी रुपयांचा समावेश) आणि 9 हजार 168 कोटी रुपयांचा सेस यांचा समावेश आहे. 30 एप्रिल 2019 पर्यंत 72.13 लाख परतावे भरण्यात आले.

आंतरराष्ट्रीय वस्तू सेवा करातून केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू सेवा करापोटी 20 हजार 370 कोटी रुपये तर राज्य वस्तू सेवा करापोटी 15 हजार 975 कोटी रुपये वर्ग केले. एप्रिल, 2019 महिन्यात नियमित आणि तात्पुरत्या समझोत्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडे अनुक्रमे 47,533 कोटी रुपये आणि 50,776 कोटी रुपये महसूल जमा झाला.

एप्रिल 2018 मध्ये 1 लाख 3 हजार 459 कोटी रुपये महसूल जमा झाला होता आणि यावर्षी जमा झालेल्या महसुलात गेल्यावर्षीच्या तुलनेत 10.05 टक्के वाढ दिसून आली.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor


(Release ID: 1571400)
Read this release in: English