संरक्षण मंत्रालय

गोव्याच्या किनाऱ्याजवळ 1 मे पासून भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या ‘वरुण 19.1’ संयुक्त कवायती

प्रविष्टि तिथि: 01 MAY 2019 3:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 मे 2019

 

‘वरुण 19.1’ या भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या संयुक्त कवायतीचा पहिला टप्पा गोव्याच्या किनाऱ्याजवळ 1 ते 10 मे दरम्यान होत आहे.

या 17 व्या कवायतींमध्ये फ्रेंच नौदलाची एफएनएस चार्ल्स द गॉल ही विमानवाहू नौका, दोन विनाशिका, एक फ्रिगेट, एक टँकर तसेच एक अणुपाणबुडी सहभागी होत आहे. भारतीय नौदलाचे आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू नौका, आयएनएस मुंबई ही विनाशिका तसेच आयएनएस तर्कश, आयएनएस शंकुल ही शिशुमार वर्गातील पाणबुडी आणि आयएनएस दीपक हे फ्लिट टँकर जहाज सहभागी होणार आहे.

ही संयुक्त कवायत दोन टप्प्यात होणार आहे. गोव्यातील बंदरामध्ये होणाऱ्या टप्प्यात परस्पर भेटी, परस्पर संवाद तसेच क्रीडा स्पर्धा घेतल्या जातील. समुद्रात होणाऱ्या टप्प्यामध्ये विविध नौदल कवायती घेतल्या जातील.

या कवायतींचा दुसरा टप्पा ‘वरुण 19.2’ जिबोती येथे मे महिन्याच्या शेवटी घेतला जाईल.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1571399) आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English