उपराष्ट्रपती कार्यालय
भारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाला उपराष्ट्रपतींची भेट
Posted On:
26 APR 2019 2:15PM by PIB Mumbai
मुंबई, 26 एप्रिल 2019
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिली. या संग्रहालयामुळे चित्रपट रसिकांना चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले त्यांचे आवडते चित्रपट, कलाकार आणि संगीताच्या जादुई दुनियेची रंजक सफर घडेल, असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.


भारतीय चित्रपट जगात सर्वाधिक लोकप्रिय असून प्रत्येक भारतीयाला सिनेमा बघणे आवडते. त्यामुळे हे प्रभावी माध्यम सामाजिक परिवर्तनाचे साधनही बनू शकते, असे ते म्हणाले. चित्रपट रसिकांना दर्जेदार, उत्तम, कथा दाखवून त्यांना शिक्षित आणि सक्षम करण्याचे काम चित्रपटसृष्टी करू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या चित्रपट संग्रहालयाला भेट दिल्यानंतर आपले अनुभव त्यांनी फेसबुकवर शेअर केले.

या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव ही उपस्थित होते.

Link: https://m.facebook.com/story.php?story_fbid=442469006321018&id=167328870501701
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1571191)
अभ्यागत कक्ष : 118