पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

इराणकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरच्या सवलती काढून टाकण्याच्या अमेरिकेच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेले निवेदन

Posted On: 23 APR 2019 8:54PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 एप्रिल 2019

 

इराणकडून विकत घेतल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरच्या खरेदीवरील सवलत काढून घेण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोलियम उत्पादनांची कमतरता जाणवू नये यासाठी सरकारने पुरेशी काळजी घेतली आहे. मे 2019 पासून भारतातील तेलशुद्धीकरण प्रकल्पांना कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा होण्याची तरतूद सरकारने केली आहे. जगातील विविध देशांकडून भारतात तेल कंपन्यांना कच्च्या तेलाचा अतिरिक्त पुरवठा होईल. कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या पूर्णपणे सज्ज असून देशात पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची मागणी पूर्ण केली जाईल.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1571088) Visitor Counter : 104


Read this release in: English