मंत्रिमंडळ

जीएसएलव्हीचा चौथा टप्पा सुरु ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 15 APR 2019 1:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019

 

जीएसएलव्हीचा सध्या सुरु असलेला चौथा टप्पा जारी ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या चौथ्या टप्प्यातल्या कार्यक्रमामुळे जिओ इमेजिंग, नेव्हीगेशन, अंतराळ विज्ञान या क्षेत्रासाठी दोन टन श्रेणीतले उपग्रह प्रक्षेपित करता येणार आहेत.

यासाठी 2729.13 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामधे पाच जीएसएलव्ही व्हेईकल, कार्यक्रम व्यवस्थापन यांचा समावेश आहे. जीएसएलव्ही कार्यक्रमाचा वाव जारी ठेवण्यासाठी अतिरिक्त निधीचीही आवश्यकता भासणार आहे.

लाभ-

जीएसएलव्ही निरंतरता कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यामुळे उपग्रह नौवहन सेवा प्रदान करण्यासाठी भारताचा मानव अंतराळ भरारी कार्यक्रम आणि मंगळ ग्रह अभियान यासंदर्भात डेटा रिले कम्युनिकेशन विषयक उपग्रह गरजा पूर्ण होणार आहेत.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 



(Release ID: 1570754) Visitor Counter : 94


Read this release in: English