राष्ट्रपती कार्यालय

रामनवमीनिमित्त राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 12 APR 2019 5:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2019

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जीवनातून आपल्याला त्यांनी दाखवलेल्या मार्गावरुन मार्गक्रमण करण्यासाठी आणि विचार आणि कृतीत महानता आणण्यासाठी प्रेरणा मिळते. समृद्ध राष्ट्र आणि सौहार्दपूर्ण जगासाठी ही मूल्यं बिंबवूया असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1570499) आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English