भारतीय निवडणूक आयोग

छत्तीसगडमधल्या बस्तर येथे 11 एप्रिल 2019 ला मतदान

Posted On: 08 APR 2019 5:52PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  8 एप्रिल 2019

 

छत्तीसगडमध्ये 11 एप्रिल 2019 ला बस्तर या एकाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 13,77,346 असून त्यापैकी 6,62,355 पुरुष तर 7,15,550 महिला आणि 41 अन्य मतदार आहे. मतदारसंघात 1, 878 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर आणि कोष्टा येथे मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 असेल.

 

N.Sapre/S.kakde/P.Kor

 


(Release ID: 1570191)
Read this release in: English