आयुष मंत्रालय

जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद

Posted On: 08 APR 2019 5:51PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  8 एप्रिल 2019

 

जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त आयुष मंत्रालयातील स्वायत्त संस्था असलेल्या केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेतर्फे नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात 9 आणि 10 एप्रिल 2019 रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

होमिओपॅथीचे जनक डॉ. क्रिश्चियन फ्रेडरिक सॅम्युअल हानेमान यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात येतो.

होमिओपॅथीमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. शिक्षण आणि संशोधन यांच्यातील समन्वयासाठी आणखी दोन होमिओपॅथी महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार होणार आहेत.

 

N.Sapre/S.kakde/P.Kor


(Release ID: 1570190) Visitor Counter : 262
Read this release in: English