राष्ट्रपती कार्यालय
चैत्र शुक्लादी, उगादी, गुढीपाडवा, चेती चांद, नौरेह आणि सजीबू चेईराओबाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
Posted On:
05 APR 2019 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2019
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी चैत्र शुक्लादी, उगादी, गुढीपाडवा, चेती चांद, नौरेह आणि सजीबू चेईराओबाच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, “चैत्र शुक्लादी, उगादी, गुढीपाडवा, चेती चांद, नौरेह आणि सजीबू चेईराओबा या पवित्र सणांनिमित्त माझ्या सर्व देशबांधवांना माझ्या शुभेच्छा.
पारंपरिकरित्या हे सण नवीन वर्षाची सुरुवात करतात. यातून समृद्धी आणि कल्याण प्रतिबिंबीत होते. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात हे सण आनंद आणि सुख घेऊन येवोत.
या सणांनिमित्त आपल्या समाजात प्रेमाचे बंध आणि बंधुभाव अधिक दृढ होवो.”
N.Sapre/S.Kane/D.Rane
(Release ID: 1570101)
अभ्यागत कक्ष : 197