अर्थ मंत्रालय
मार्च 2019 मध्ये जीएसटी महसूल संकलनाने ओलांडला 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा, 2018-19 आर्थिक वर्षातली सर्वाधिक संकलनाची नोंदणी
Posted On:
01 APR 2019 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2019
मार्च 2019 मध्ये जीएसटी महसूल संकलन 1,06,577 कोटी रुपये इतके झाले. यामधे सीजीएसटी 20,353 कोटी रुपये, एसजीएसटी 27,520 कोटी रुपये, आयजीएसटी 50,418 कोटी रुपये (आयातीवरील 23,521 कोटी रुपयांसह), तर उपकर 8,286 कोटी रुपये (आयातीवरील 819 कोटी रुपयांसह) समाविष्ट आहे. 31 मार्च 2019 पर्यंत फेब्रुवारी महिन्यासाठी 75.95 लाख जीएसटीआर 3बी विवरण पत्र दाखल करण्यात आली.
सरकारने सीजीएसटीला 17,261 कोटी रुपये, तर एसजीएसटीला 13,689 कोटी रुपये आयजीएसटीमधून दिले. केंद्र सरकारला 47,614 कोटी रुपये आणि राज्य सरकारला 51,209 कोटी रुपये निव्वळ महसूल मिळाला आहे.
मार्च 2019 मधे जीएसटीचे संकलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक संकलन आहे. मार्च 2018 मधे 92,167 कोटी रुपये महसूल होता. मार्च 2019 मधे यात 15.6 टक्के वाढ झाली आहे.
N.Sapre/S.Kane/D.Rane
(Release ID: 1569920)
Visitor Counter : 250