संरक्षण मंत्रालय

मदत सामग्रीसह ‘आयएनएस मगर’ मोझाम्बिकला रवाना

प्रविष्टि तिथि: 28 MAR 2019 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मार्च 2019

 

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मोझाम्बिकला मदत सामग्री पोहोचवण्यासाठी ‘आयएनएस मगर’ युद्धनौका आज मुंबईहून पोर्ट बैरा इथे रवाना झाली.

अत्यावश्यक औषधे, साथप्रतिबंधक औषधे, अन्नसामग्री, कपडे, तात्पुरता निवारा व दुरुस्ती आणि पुनर्वसनाची साधने अशी 300 टन मदत सामग्री या युद्धनौकेवर आहे, तसेच चेतक हेलिकॉप्टरही त्यावर आहे.

मोझाम्बिकच्या मदतीसाठी भारताने पाठवलेली नौदलाची ही चौथी नौका आहे.

 

 

M.Chopade/ S.Kakade/D.Rane

 

 


(रिलीज़ आईडी: 1569784) आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English