पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे राष्ट्राला संबोधन

Posted On: 27 MAR 2019 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित केले.

प्रत्येक राष्ट्राच्या प्रवासात सर्वोच्च अभिमानाचे आणि भावी पिढ्यांवर ऐतिहासिक परिणाम घडविणारे काही क्षण असतात. असाच आजचा एक क्षण आहे. भारताने अँटी सॅटेलाईट क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. मिशन शक्तीच्या या यशाबद्दल प्रत्येकाचे अभिनंदन.

मिशन शक्ती हे अतिशय गुंतागुंतीचे होते, अतिशय जलदगतीने आणि कमालीच्या अचूकतेने मिशन शक्ती पार पडले. भारताच्या वैज्ञानिकांच्या कौशल्याचे आणि आपल्या अंतराळ कार्यक्रमाच्या यशाचे मिशन शक्तीमुळे दर्शन झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

अशा प्रकारची विशेष आणि आधुनिक क्षमता धारण करणारा भारत हा जगातला चौथा देश आहे. हे संपूर्णपणे भारतातच विकसित करण्यात आले आहे. या दोन बाबींमुळे मिशन शक्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

अंतराळा शक्ती म्हणून भारताची मान उंचावली आहे. यामुळे भारत अधिक मजबूत, अधिक सुरक्षित होणार असल्याचे पंतप्रधानांनी संदेशात सांगितले आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/D. Rane

 


(Release ID: 1569570) Visitor Counter : 197


Read this release in: English