भारतीय निवडणूक आयोग
सोशल मिडियाकडून 2019च्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी स्वेच्छा आचारसंहिता, निवडणूक आयोगाला सादर
Posted On:
20 MAR 2019 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2019
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आणि इंटरनेट ॲन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात आयएएमएआयने 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी स्वेच्छा आचारसंहिता, निवडणूक आयोगाला सादर केली. आयएएमएआय आणि फेसबुक, व्हॉटसॲप, व्टिटर, गुगल, शेअर चॅट यासारख्या सोशल मिडियाचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही आचारसंहिता विकसित करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी या स्वेच्छा आचारसंहितेची प्रशंसा केली. संबंधितांनी याचे शब्दश: पालन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगासाठी सर्वोच्च प्राधान्य असलेली यंत्रणा निर्माण करण्यासाठी आणि सार्वत्रिक निवडणूकांदरम्यान, नियमांच्या कथित उल्लंघनाप्रकरणी जलदगतीने कार्यवाही करण्यासंदर्भात पथके नियुक्त करण्यालाही सोशल मिडिया मंचाने सहमती दर्शवली आहे.
2019 च्या सार्वत्रिक निवडणूकात सोशल मिडियाचा नि:पक्ष आणि नैतिक उपयोग व्हावा, यादृष्टीने ही ऐच्छिक आचारसंहिता विकसित करण्यात आली आहे. ही आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली आहे.
B.Gokhale/N.Chitale/D. Rane
(Release ID: 1569271)
Visitor Counter : 125