निती आयोग

इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरमची पहिली कार्यशाळा

Posted On: 14 MAR 2019 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2019

 

नीती आयोग आणि आंतरराष्ट्रीय विकासासाठीची युनायटेड स्टेट्‌स एजन्सी (युएसएआयडी) यांनी इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरमच्या विकासासाठी पहिली कार्यशाळा आयोजित केली आहे. नीती आयोगाचे उपाध्याक्ष डॉ. राजीव कुमार आणि  युएसएआयडीचे उपक्रम संचालक मार्क व्हाईट या कार्यशाळेच्या उद्‌घाटनपर सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. ऊर्जा आणि पर्यावरणविषयक महत्वाच्या मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ आणि धोरणकर्त्यांना इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरमद्वारे मंच उपलब्ध करुन दिला जात आहे.

या कार्यशाळेत आठ सत्र होणार असून त्यामध्ये भारताला केंद्रस्थानी करत ऊर्जा मॉडेलिंग मंच स्थापन करण्यासंदर्भातल्या विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. महत्वाचे निर्णय घेण्यासंदर्भात ऊर्जा मॉडेलिंग महत्वाची भूमिका कशा प्रकारे बजावू शकते यासंदर्भातही यामध्ये चर्चा अपेक्षित आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 



(Release ID: 1568863) Visitor Counter : 186


Read this release in: English