कंपनी व्यवहार मंत्रालय
उत्तरदायी व्यवसाय आचरणासंदर्भात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे
Posted On:
13 MAR 2019 5:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2019
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सामाजिक, पर्यावरणविषयक आणि आर्थिक उत्तरदायित्व याबाबतच्या व्यवसायासाठीच्या राष्ट्रीय ऐच्छिक मार्गदर्शक तत्वात सुधारणा करुन उत्तरदायी व्यवसाय आचरण याबाबत राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत.
व्यवसायांनी या तत्वाचा अंगीकार करावा असे या मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे-
- व्यवसायांनी नैतिक, पारदर्शी आणि उत्तरदायी पद्धतीने व्यवसाय आचरण ठेवावे.
- व्यवसायांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा आदर राखावा आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन द्यावे.
- व्यवसायांनी मानवाधिकाराचा आदर राखत त्याला प्रोत्साहन द्यावे.
- व्यवसायांनी पर्यावरण जतन आणि संरक्षणासाठी प्रयत्न करावेत.
- व्यवसायांनी जनता आणि नियामक धोरणाशी संबंधित कामकाजात उत्तरदायी आणि पारदर्शीत्व राखावे.
- व्यवसायांनी समावेशक विकासाला प्रोत्साहन द्यावे.
यांचा यात समावेश आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1568768)
अभ्यागत कक्ष : 172