विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भाभा अणू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून डॉ. ए.के.मोहंती यांनी पदभार स्वीकारला

Posted On: 12 MAR 2019 4:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2019

 

भाभा अणू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भाभा अणू संशोधन केंद्राच्या भौतिक समूहाचे संचालक डॉ. ए के मोहंती यांनी आज पदभार स्वीकारला. भाभा अणू संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण विद्यालयाच्या 26 व्या तुकडीचे पदवीधर असलेले डॉ. मोहंती 1983 मधे भाभा अणू संशोधन केंद्राच्या न्युक्लीअर फिजिक्स विभागात दाखल झाले. 36 वर्षाच्या कारकीर्दीत डॉ. मोहंती यांनी न्युक्लीअर फिजिक्सच्या विविध क्षेत्रात कार्य केले आहे.

डॉ. मोहंती यांना 1988 मधे भारतीय भौतिक सोसायटीच्या युवा वैज्ञानिक पुरस्काराने, 1991 मध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या युवा भौतिकशास्त्रज्ञ पुरस्काराने तर 2001 मध्ये होमी भाभा विज्ञान आणि तंत्रज्ञान अणू ऊर्जा विभागाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1568670)
Read this release in: English