पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिन समारंभाला पंतप्रधान उद्या राहणार उपस्थित
प्रविष्टि तिथि:
09 MAR 2019 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मार्च 2019 रोजी गाजियाबाद येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 50 व्या स्थापना दिन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
गाझियाबादमधल्या इंद्रपुरम् इथल्या 5 व्या बटालियन कॅम्पमध्ये आयोजित समारंभात पंतप्रधान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या संचलनाची मानवंदना स्वीकारतील. उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्यांना पंतप्रधान पोलीस आणि अग्नीसेवापदक प्रदान करतील.
पंतप्रधान हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील तसेच ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना संबोधितही करतील.
B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1568649)
आगंतुक पटल : 126
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English