महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला उपजिविका आणि कौशल्य विकासाद्वारे महिला सशक्तीकरणासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 08 MAR 2019 5:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 मार्च 2019

 

महिला उपजिविका सुधारणा आणि कौशल्य विकासाद्वारे महिला सशक्तीकरण साध्य करण्याच्या उद्देशाने महिला आणि बालविकास मंत्रालय आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाने सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी आणि केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

या नव्या उपक्रमामुळे महिलांना, रोजगारक्षम आणि ताबडतोब उत्पन्न होऊ शकणारे कौशल्य प्राप्त करण्यासाठी मदत होणार असल्याचे मनेका गांधी यांनी यावेळी सांगितले.

महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारे कौशल्य त्यांना प्रदान करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा आपल्या मंत्रालयाचा निर्धार असल्याचे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1568326) Visitor Counter : 160


Read this release in: English