मंत्रिमंडळ

दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 07 MAR 2019 8:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याला मान्यता देण्यात आली. यामध्ये 3 कॉरीडॉर राहतील. या 3 कॉरीडॉरची एकूण लांबी 61.679 किमी आहे.यापैकी 22.359 किमी भूमिगत तर  39.320 किमी उन्नत मार्ग राहणार आहे.या कॉरीडॉरमधे 46 स्थानके राहतील.त्यापैकी 17 भूमिगत तर 29 उन्नत स्थानके राहतील.

3 मेट्रो कॉरीडॉरसाठी  24,948.65 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

प्रभाव-

चौथ्या टप्प्यामुळे राष्ट्रीय राजधानीची आणखी क्षेत्रे आपसात जोडली जाणार आहेत.यामुळे रस्ते वाहतुकीची कोंडी कमी व्हायला आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हायला मदत होईल.हे तीन कॉरीडॉर पूर्ण झाल्यानंतर दिल्ली मेट्रोची एकूण लांबी 400 किलोमीटरच्या पुढे जाणार आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor

 



(Release ID: 1568199) Visitor Counter : 63


Read this release in: English