आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

एप्रिल 2017 ते मार्च 2020 या तीन वर्षांसाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम-4 सुरू ठेवण्‍यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 07 MAR 2019 4:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम-4 बाराव्या पंचवार्षिक योजनेनंतरही एप्रिल 2017 ते मार्च 2020 या तीन वर्षांकरता सुरू ठेवण्याला मान्यता देण्यात आली. यासाठी 6 हजार 434.76 कोटी रुपये एकूण खर्च होईल.

फायदे –

  • 99 टक्के लोकसंख्या एचआयव्ही मुक्त राहील.
  • सर्वंकष एचआयव्ही प्रतिबंध कार्यक्रमाअंतर्गत 70 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचा समावेश
  • 3 वर्षाच्या प्रकल्पात सुमारे 15 कोटी असुरक्षित लोकसंख्येची (5 कोटी गरोदर महिलांसह) एचआयव्हीसाठी तपासणी
  • 3 वर्षात नैको सहाय्यित रक्तपेढ्यांमार्फत 2 कोटी 32 लाख युनिट रक्ताची
  • तीन वर्षाच्या कालावधीत या प्रकल्पाअंतर्गत लैंगिक संबंधातून प्रसारीत झालेल्या आणि लागण झालेल्या 2 कोटी 82 लाख प्रकरणांचे व्यवस्थापन
  • 17 लाख पीएलएचआयव्ही प्रकल्पाच्या कालावधीत पुन्हा लागण होऊ नये म्हणून मोफत औषधोपचार

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1567890) Visitor Counter : 54


Read this release in: English