आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा -3 अ साठी मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 07 MAR 2019 3:52PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक समितीने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प, टप्पा -3 अ साठी मंजुरी दिली आहे.

खर्च-

 या  प्रकल्पासाठी 30,849 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

लाभ-

 प्रवाशांची सुरक्षितता आणि सुखद प्रवासासाठी आपोआप उघडणाऱ्या दरवाज्यांसह वातानुकुलीत डब्यांचा समावेश

कॉरीडॉर निर्मिती आणि त्याचा विस्तार करून दूर अंतराच्या उपनगरी प्रवाशांसाठी सुखकर प्रवास

प्रवासी सुविधेत  सुधारणा

स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी गर्दी आणि प्रवाशांची कोंडी कमी करणे

दळणवळणावर आधारित रेल्वेगाडी  नियंत्रण यंत्रणा आणून उपनगरी जाळ्याची क्षमता,सुरक्षितता वाढवणे

मध्य आणि पश्चिम रेल्वे वर उपनगरी रेल्वे कार्यान्वयनाचे विलगीकरण

पूर्वपीठीका

मुंबई उपनगरी रेल्वे जाळ्यामध्ये  मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 385 किमीचा मार्ग आहे.सकाळी कामावर जाण्याच्या  आणि संध्याकाळी  घरी परतण्याच्या ठराविक वेळी, उपनगरी गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. यावेळी क्षमतेच्या चौपट प्रवासी या गाड्यातून प्रवास करतात.    

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1567857) Visitor Counter : 53


Read this release in: English