संरक्षण मंत्रालय

सशस्त्र दलांमध्ये महिलांना परमनंट कमिशन

Posted On: 05 MAR 2019 8:26PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2019

 

सशस्त्र दलांमध्ये महिलांना परमनंट कमिशन देण्यासंदर्भत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली आहेत.

भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिकासह सर्व विभाग महिला अधिकाऱ्यांसाठी खुले आहेत.

भारतीय नौदलात समुद्रावर कार्यरत नसणारे सर्व विभाग शॉर्ट टर्म कमिशनच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी खुले करण्यात आले आहेत. शिक्षण, कायदा आणि नौदल शाखेसह शॉर्ट टर्म कमिशन महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या विभागात पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणेच परमनंट कमिशनसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. नौदलाच्या प्रस्तावित तीन नव्या प्रशिक्षण जहाजांवर महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

लष्कराच्या ज्या सर्व दहा विभागात महिलांना शॉर्ट टर्म कमिशन देण्यात आले आहे, त्या सर्व ठिकाणी महिलांना परमनंट कमिशन देण्यात येणार आहे.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor


(Release ID: 1567608) Visitor Counter : 177


Read this release in: English