वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-अमेरिका व्यापार मुद्दे

Posted On: 05 MAR 2019 2:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5  मार्च 2019

 

भारताला मिळणारा विशेष प्राधान्य दर्जा काढून घेण्याविषयी अमेरिकेने आज 60 दिवसाची नोटीस दिली आहे.

अमेरिकेत 2018 मध्ये जीएसपी फायदे प्रणालीचा आढावा घ्यायला प्रारंभ केल्यानंतर यासंदर्भात दोन्ही देशांना मान्य असणाऱ्या अटींवर तोडगा काढण्यासाठी भारत आणि अमेरिकेने व्यापार विषयक विविध मुद्यांवर चर्चा सुरू केली होती. जीएसपी दर्जा म्हणजे विकसित देशांनी विकसनशील देशांना परतफोडीशिवाय आणि भेदभावाशिवाय दिलेले लाभ आहेत. भारताला अमेरिकेकडून मिळणाऱ्या जीएसपी सवलतींमुळे दरवर्षी 190 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर सवलती मिळतात. अमेरिकन सेवा क्षेत्र आणि 9 व्यापार कंपन्यांसाठी भारत हा भरभराटीला येणारी बाजारपेठ आहे. परंतु वर्ष 2017-18 मध्ये स्वावलंबित्वावर आधारित निर्णयामुळे तेल नैसर्गिक वायुवरील आपले अमेरिकेवरील परावलंबित्व कमी झाल्याने त्याचा परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेला सोसावा लागला आहे. तसेच दुग्धउत्पादन क्षेत्रातही भारताची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

अमेरितील वैद्यकीय उपकरणे आणि दुग्ध व्यवसायाने केलेल्या विनंतीनुसार अमेरिकेने हा आढावा हाती घेतला आहे. भारताने या दोन्ही मुद्यांवर अमेरिकेला वाटणाऱ्या चिंताबाबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्यासाठी उपरोक्त सुचना जारी केली आहे.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor

 



(Release ID: 1567472) Visitor Counter : 196


Read this release in: English