मंत्रिमंडळ

राष्ट्रीय सॉफ्टवेअर उत्पादने धोरण - 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 28 FEB 2019 11:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताला सॉफ्टवेअर उत्पादक देश म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सॉफ्टवेअर उत्पादने धोरण - 2019 ला मंजुरी दिली आहे.
 

मुख्य प्रभाव:
नवसंशोधन, बौद्धिक संपत्ती (आयपी) निर्मिती आणि उत्पादकतेत मोठी मूल्यवृद्धी हे सॉफ्टवेअर उत्पादन परिसंसंस्थेचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये या क्षेत्रातील महसूल व निर्यातीला चालना देण्याची, रोजगार निर्मितीची आणि नवीन तंत्रज्ञानातील व्यावसायिक संधीं उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल.

खर्च-
सुरूवातीला, 7 वर्षांच्या कालावधीत या धोरणांतर्गत कार्यक्रम / योजना राबवण्यासाठी 1500 कोटी रुपयांचा खर्च समाविष्ट आहे. 1500 कोटी रुपये सॉफ्टवेअर उत्पादन विकास निधी  (एसपीडीएफ) आणि संशोधन आणि विकास निधीमध्ये विभागले गेले आहेत.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्ट
या धोरणामुळे देशात सॉफ्टवेअर उत्पादनाच्या विकासासाठी अनेक योजना, उपक्रम, प्रकल्प आणि उपायायोजना आखल्या जातील.
एनपीएसपी - 2019 ची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी या धोरणामध्ये खालील पाच अभियानाचा समावेश आहे.

  • 2025 पर्यंत बौद्धिक संपत्ती (आयपी) द्वारे चालविण्यात येणाऱ्या शाश्वत भारतीय सॉफ्टवेअर उत्पादन उद्योगाच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन जागतिक सॉफ्टवेअर उत्पादन बाजारातील भारताचा हिस्सा दहापटीने वाढवणे.
  • 2025 पर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये 1000 तंत्रज्ञान स्टार्टअपसह सॉफ्टवेअर उत्पादन उद्योगात दहा हजार तंत्रज्ञान स्टार्टअप्स विकसित करणे आणि  3.5 दशलक्ष लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणे.
  • सॉफ्टवेअर उत्पादनाच्या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिभावंत तयार करण्यासाठी (i)1,000,000 आयटी व्यावसायिकांचे कौशल्य वाढवणे, (ii)100,000 शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरित करणे आणि (iii)10,000 विशिष्ट व्यावसायिक जे नेतृत्व प्रदान करू शकतात.
  • एकात्मिक आयसीटी पायाभूत सुविधा, विपणन, इन्क्युबेशन, संशोधन आणि विकास टेस्टबेड्स आणि मार्गदर्शन असलेल्या 20 क्षेत्रीय आणि मोक्याच्या ठिकाणी सॉफ्टवेअर उत्पादनाच्या विकासाच्या क्लस्टर्स विकसित करून क्लस्टर-आधारित नवाचार संचालित परिसंस्था तयार करणे.

या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी योजना आणि कार्यक्रमांवर देखरेख ठेवण्यासाठी  सरकार, शैक्षणिक आणि उद्योगातील सहभागासह राष्ट्रीय सॉफ्टवेअर उत्पादने मिशन स्थापित केली जातील. 


B.Gokhale/S.Kane/D.Rane
 

 

 


(रिलीज़ आईडी: 1567148) आगंतुक पटल : 99
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English