रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या तामिळनाडू विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी

प्रविष्टि तिथि: 28 FEB 2019 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूत 2995 कोटी रुपये खर्चाच्या विविध महामार्ग प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. कन्याकुमारी इथे उद्या पंतप्रधान 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. तसेच पंतप्रधान रस्त सुरक्षा उद्यान आणि वाहतूक संग्रहालयाचाही शुभारंभ करतील.

या प्रकल्पांमुळे प्रदूषण कमी होईल तसेच वेगवान आणि सुरक्षित प्रवास शक्य होईल आणि प्रवासाच्या वेळेत बचत होऊन इंधनाचाही बचत होईल.

 

 

B.Gokhale/J.Patankar/D. Rane

 


(रिलीज़ आईडी: 1566674) आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English