वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

सुरेश प्रभू यांनी एलएसी विभागातील राजनैतिक अधिकाऱ्यांना केले संबोधित

Posted On: 28 FEB 2019 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019

 

केंद्रीय व्यापार, उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी काल नवी दिल्लीत भारत-लॅटीन अमेरीका आणि कॅरीबीयन सामरीक (एलएसी) आर्थिक सहकार्य राजनैतिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या देशांशी द्विपक्षीय व्यापार आणि सेवा वृद्धिंगत करण्यासाठी बहुआयामी रणनिती आखण्यावर प्रभू यांनी यावेळी बोलतांना भर दिला. गेल्या काही दशकात व्यापाराची पद्धती बदलली असून, आता विविध मूल्यवर्धित पातळ्यांवरील व्यापार क्रिया निरनिराळ्या देशात होतात, असे प्रभू यांनी सांगितले.

एलएसी आणि भारतातील व्यापार वृद्धीची व्यूहरचना ही विविध निर्मिती आणि सेवा क्षेत्राच्या एकात्मिकरणावर अवलंबून आहे, असे प्रभू म्हणाले.

कृषी, आरोग्य, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सहकार्यासाठी मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले. झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारताची अन्न आणि ऊर्जा क्षेत्रातील गरज वाढत असून, एलएसी भागीदारांसोबतचे दृढ संबंध परस्पर लाभदायक ठरतील, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.

व्यापार सचिव डॉ. अनुप वाधवान, तसेच एलएसी देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

 

N.Sapre/J.Patankar/D. Rane

 


(Release ID: 1566670) Visitor Counter : 43
Read this release in: English