पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान प्रदान करणार शांती स्वरुप भटनागर पुरस्कार

प्रविष्टि तिथि: 27 FEB 2019 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शांती स्वरुप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार प्रदान करतील. हा पुरस्कार वर्ष 2016, 2017 आणि 2018 या वर्षासाठी देण्यात येणार आहे. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथे 25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक-संचालक डॉ. शांती स्वरुप भटनागर यांच्या नावाने हे पुरस्कार देण्यात येतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांनी दिलेल्या अपूर्व योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

 

 

B.Gokhale/J.Patankar/D. Rane

 


(रिलीज़ आईडी: 1566619) आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English