संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉटर कोसळले
Posted On:
27 FEB 2019 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2019
27 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाच्या एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरने श्रीनगर विमानतळावरुन सकाळी 10 वाजता नियमित अभियानासाठी उड्डाण केले. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी हे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरच्या बडगाम जवळ कोसळले. हेलिकॉप्टरमधील सर्व 6 हवाई योद्धांना वीरमरण आले. या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
N.Sapre/J.Patankar/D. Rane
(Release ID: 1566610)