परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्याचे निवेदन
प्रविष्टि तिथि:
27 FEB 2019 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2019
जैश-ए-महंमद आणखी हल्ले करणार असल्याच्या विश्वासार्ह पुराव्यावर आधारित भारताने जैश-ए-महंमदच्या पाकिस्तानमधल्या प्रशिक्षण तळावर काल केलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईची माहिती भारताने दिली आहे. या दहशतवाद विरोधी कारवाई विरोधात पाकिस्तानने आपल्या हवाई दलाचा वापर करत, आज सकाळी भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले. आपण सतर्क आणि तत्पर असल्यामुळे पाकिस्तानचा हा प्रयत्न यशस्वीरित्या निष्फळ ठरवला.
पाकिस्तानी हवाई दल निदर्शनाला आल्यानंतर भारतीय हवाई दलाने तत्पर कारवाई केली. यावेळी भारतीय हवाई दलाच्या मिग 21 विमानाने पाकिस्तानी हवाई दलाचे लढाऊ विमान पाडले. पाकिस्तानचे विमान कोसळताना पाहण्यात आले मात्र या दरम्यान दुर्देवाने आपण एक मिग 21 विमान गमावले. वैमानिक बेपत्ता आहे. हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. यासंदर्भात आम्ही तथ्याची पडताळणी करत आहोत.
N.Sapre/N.Chitale/D. Rane
(रिलीज़ आईडी: 1566548)
आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English