अर्थ मंत्रालय
पीएम-किसान योजनेतील लाभार्थींना निधीचे यशस्वीरित्या इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण : एक ऐतिहासिक सफलता
Posted On:
25 FEB 2019 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर इथे पीएम-किसान योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत 24 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील 1 कोटी 1 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2021 कोटी रुपयांचा पहिला हप्ता इलेक्ट्रॉनिक हस्तांतरणाद्वारे थेट जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत 2 हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या छोट्या शेतकरी कुटुंबांना दरवर्षी प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांच्या माध्यमातून 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पीएम-किसान योजनेअंतर्गत हा थेट लाभ हस्तांतरण सार्वजनिक अर्थव्यवस्था प्रणाली अर्थात पीएफएमएस द्वारे देण्यात येईल. या प्रक्रियेत पारदर्शकरित्या लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा होईल. लाभार्थींच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होण्यापूर्वी त्यांच्या बँक खात्यांची पडताळणी पीएफएमएस आणि 273 बँकांमार्फत करण्यात येणार आहे.
पीएफएमएस अंतर्गत होणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक हस्तांतरणामुळे केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला अधिक बळ मिळणार आहे.
N.Sapre/J.Patankar/D. Rane
(Release ID: 1566216)
अभ्यागत कक्ष : 102