पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्राला करणार समर्पित

Posted On: 24 FEB 2019 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यावेळी ते माजी सैनिकांना संबोधितही करतील.

नवी दिल्लीतल्या इंडिया गेट जवळ असणारे राष्ट्रीय युद्ध स्मारक म्हणजे स्वातंत्र्यानंतर देशाची रक्षा करतांना प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या सैनिकांना दिलेली मानवंदना आहे.

राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये शांतता काळात आणि घुसखोरी विरुद्धच्या लढ्यात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांचाही अंतर्भाव आहे.

2014 मध्ये जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाबाबतचा आपला दृष्टीकोन पंतप्रधानांनी मांडला होता.

राष्ट्रीय युद्ध स्मारकात 4 वर्तुळ असून, त्यांना ‘अमर चक्र’ ‘वीरता चक्र’ ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशी नावे देण्यात आली आहेत.

राष्ट्रीय युद्ध स्मारकात मध्यवर्ती स्तंभ, अक्षय ज्योत आणि भारतीय सैन्यदल, हवाई दल आणि नौदलाने लढलेल्या प्रसिद्ध लढाया दर्शवणाऱ्या 6 कांस्य चित्रांचा समावेश आहे.

‘परम वीर योद्धा स्थलवर 21 परमवीर चक्र विजेत्यांचे अर्धपुतळे आहेत, यामध्ये सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) बन्ना सिंग (निवृत्त), सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव आणि सुभेदार संजय कुमार या तीन हयात विजेत्यांचा समावेश आहे.

शहीदांना आदरांजली अर्पण करणाऱ्या कृतज्ञ देशाच्या एकत्रित भावनांचा राष्ट्रीय युद्ध स्मारक हा अविष्कार आहे.

 

 

N.Sapre/J.Patankar/D. Rane



(Release ID: 1566191) Visitor Counter : 171


Read this release in: English