इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल इंडिया पुरस्कार प्रदान
Posted On:
22 FEB 2019 5:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2019
डिजिटल इंडिया उपक्रमाकडे माहिती तंत्रज्ञान आणि प्रशासनापलीकडे पाहिले पाहिजे, सर्वसामान्य माणसाला सक्षम करण्याच्या उद्देशाने सरकारने हा उपक्रम सुरु केला, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत डिजिटल इंडिया पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते. देशात डिजिटल प्रशासनाचे युग आणण्याचे एनआयसीचे प्रयत्न अत्यंत महत्वाचे ठरले असल्याचे ते म्हणाले.
माहिती विश्लेषणाचे केंद्र होण्याची पूर्ण क्षमता भारताकडे आहे. कृषी क्षेत्र, सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षण अधिक प्रगत कसे करता येईल, यासाठी तसेच अल्प खर्चातील तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यनिगा यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत एनआयसीने काम करावे, अशी सूचना प्रसाद यांनी केली.
N. Sapre/S.Kakade/D. Rane
(Release ID: 1565982)
Visitor Counter : 151