उपराष्ट्रपती कार्यालय
राजकारण बाजूला ठेवून केंद्र आणि राज्य सरकारांनी संघभावनेने काम करावे - उपराष्ट्रपती
Posted On:
20 FEB 2019 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2019
देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी संघभावनेने काम करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ते आज तिरुपती विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण आणि मजबुतीकरण पायाभरणी कार्यक्रमात बोलत होते. सध्याची धावपट्टी केवळ एबी-320/ एबी-321 प्रकारच्या विमानांच्या कार्यान्वयासाठीच आहे. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर बी-747-400, बी 777-300 अशी मोठी विमानेही धावपट्टीवर उतरू शकतील, असे नायडू यांनी सांगितले. तिरुपतीच्या विकासासाठी केंद्र सरकारने विविध प्रकल्प सुरू केले आहेत असे सांगून उपराष्ट्रपतींनी स्थानिक अधिकाऱ्यांना हे तीर्थस्थळ स्मार्ट शहरात विकसित करण्यासाठी काम करण्याचे निर्देश दिले.
N. Sapre/S.Kakade/D. Rane
(Release ID: 1565634)
Visitor Counter : 78