मंत्रिमंडळ

अवकाश विभागाच्या अंतर्गत नवी कंपनी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 19 FEB 2019 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाश विभागाअंतर्गत नवी कंपनी सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्त्रोने केलेल्या संशोधन आणि विकास कामांचा व्यावसायिक वापर करून घेण्यासाठी अवकाश विभागाच्या अखत्यारीतच हे एक वेगळे कार्यालय सुरु केले जाणार आहे

 ठळक वैशिष्ट्ये :

 इस्त्रोच्या विविध संशोधनांचा व्यवसायिक कामांसाठी वापर करण्याच्या संधी देणारे मार्ग पुढीलप्रमाणे -

  1. छोट्या उपग्रहांच्या तंत्रज्ञानाचे उद्योगक्षेत्राला हस्तांतरण, ज्यात नवी कंपनी अवक्स्श विभाग किंवा इस्त्रोकडून परवाना घेईल आणि उप-परवाना संबंधित उद्योगांना देईल.
  2. खाजगी क्षेत्राच्या सहकार्यातून छोट्या उपग्रह प्रक्षेपक वाहनांची निर्मिती
  3. उद्योग क्षेत्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहनांची निर्मिती
  4. अवकाश-संबंधित उत्पादने आणि सेवा, ज्यात प्रक्षेपक आणि उपकरणे यांचा समावेश असेल, त्यांची निर्मिती करणे
  5. इस्त्रो केंद्रांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि अवकाश विभागांच्या वेगळ्या घटकांची/कार्यालयांची स्थापना
  6. भारत आणि परदेशात काही नवनवे तंत्रज्ञान आणि उत्पादने यांचे मार्केटिंग करणे
  7. भारत सरकारला योग्य वाटेल असा इतर कुठलाही विषय.

 

 

B.Gokhale/R.Aghor/D. Rane



(Release ID: 1565519) Visitor Counter : 84


Read this release in: English