मंत्रिमंडळ

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई भत्यात वाढ करण्यासाठी अतिरिक्त निधी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, अतिरिक्त भत्ता 1 जानेवारी 2019 पासून लागू होणार

प्रविष्टि तिथि: 19 FEB 2019 10:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्यात वाढ करण्यासाठी अतिरिक्त निधी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा अतिरिक्त भत्ता 1 जानेवारी 2019 पासून लागू होणार आहे. सध्या असलेल्या 9 टक्के महागाई भत्यात 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर हा भत्ता लागू राहील. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार ही दरवाढ करण्यात आली आहे.

या महागाई भत्यामुळे, सरकारी तिजोरीवर, दरवर्षी 9168.12 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या निर्णयाचा लाभ 48.41 लाख सरकारी कर्मचारी आणि 62.03 लाख निवृत्तीवेतन धारकांना होणार आहे.

 

 

B.Gokhale/R.Aghor/D. Rane

 

 


(रिलीज़ आईडी: 1565515) आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English