मंत्रिमंडळ

दीनदयाळ अंत्योदय योजना –राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 19 FEB 2019 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019

 

जागतिक बँकेकडून ऋण सहाय्यते द्वारा, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन या बाह्य सहाय्यता प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.

लाभ :

एनआरईटीपी द्वारा उपलब्ध करण्यात येणाऱ्या तांत्रिक सहाय्यामुळे आणि प्रकल्प सुलभतेसाठीच्या उच्च स्तरीय उपायांमुळे उपजीविका आणि वित्तीय सुविधेत वाढ होईल.

ठळक वैशिष्ट-

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत गरीब आणि वंचित समुदायावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच त्यांच्या वित्तीय समावेशनावर भर देण्यात आला आहे. एनआरईटीपी अंतर्गत, वित्तीय समावेशनासाठी पर्यायी माध्यमांचे मार्गदर्शन, ग्रामीण उत्पादनासाठी मूल्य शृंखला, उपजीविका संवर्धन संबंधात कल्पक प्रकल्प, डिजिटल वित्त सुविधा यांना प्रोत्साहन देणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरु केले जातील.

 

 

B.Gokhale/N.Chitale/S.Kane/D. Rane

 

 


(Release ID: 1565503) Visitor Counter : 95
Read this release in: English