भारतीय निवडणूक आयोग

नवे निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्रा यांनी पदभार स्वीकारला

Posted On: 15 FEB 2019 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2019

 

देशाचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्रा यांनी आज पदभार स्वीकारला.

15 मे 1957 रोजी जन्मलेले चंद्रा हे 1980 च्या भारतीय महसूल सेवा तुकडीतले अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत काम करताना चंद्रा यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांसाठी काम केले आहे. आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि तपास या क्षेत्रात चंद्रा यांचा दांडगा अनुभव आहे.

निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी चंद्रा यांनी केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1564802) अभ्यागत कक्ष : 147
Read this releasein: English