मंत्रिमंडळ

छत्तीसगडच्या अनुसूचित जमातींच्या यादीत दुरुस्ती करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 FEB 2019 10:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने छत्‍तीसगडच्या अनुसूचित जमातींच्या यादीत दुरुस्ती करण्यासाठी संविधान (अनुसूचित जाति आणि जमाती) सुधारणा विधेयक-2016 मध्ये दुरुस्ती करायच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

छत्‍तीसगडच्या अनुसूचित जमातीच्या यादीत पुढील बदल केले जातील-

प्रविष्‍टि‍ 5 मध्ये  ‘’भारिया भूमिया’’ नंतर  ‘’भुईंया, भूईयान, भूयान’’ यांचा समावेश केला जाईल.

प्रविष्टि 14 च्या ऐवजी ‘’14. धनवार, धनुहर, धनुवार’’  टाकले जाईल.

प्रविष्टि 32 आणि 33 च्या जागी :- ‘’32. नगेसिया, नागासिया, किसान 33. ओरांव, धानका, धनगढ़’’

प्रविष्टि 41 च्या जागी ‘’ 41 सवर, संवारा, सोनरा, साओनरा’’,

प्रविष्टि 42 नंतर -‘’43.बिनझिया’’

या कायद्याला संविधान (अनुसूचित जाति आणि अनुसूचित जमाती सुधारणा विधेयक-2019 म्हणता येईल. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर छत्‍तीसगडच्या अनुसूचित जमातीतील नवीन सूचीबद्ध समुदायांना लाभ मिळू शकतील. या प्रमुख योजनांमध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती , राष्‍ट्रीय विदेशी शिष्यवृत्ती, राष्‍ट्रीय फेलोशिप, राष्‍ट्रीय अनुसूचित जमाती वित्‍त आणि विकास महामंडळाकडून उच्‍च शिक्षणासाठी सवलतीच्या दरात कर्ज आदींचा समावेश आहे. याशिवाय सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठीही ते पात्र असतील.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1564467) Visitor Counter : 97


Read this release in: English