आयुष मंत्रालय

आयुष औषधांच्या ऑनलाईन परवाना प्रणालीसाठी ई-औषधी पोर्टलचा प्रारंभ

Posted On: 13 FEB 2019 6:12PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,13 फेब्रुवारी 2019

 

आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी औषधांच्या ऑनलाईन परवाना प्रणालीसाठी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांनी आज नवी दिल्लीत ई-औषधी पोर्टलचा प्रारंभ केला. या पोर्टलमुळे अधिक पारदर्शकता येईल तसेच सुधारित माहिती व्यवस्थापन उपलब्ध होईल, असे नाईक यांनी यावेळी सांगितले. या पोर्टलकडे येणाऱ्या अर्जांची प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावरील माहिती एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. ई-गव्हर्नंन्स, व्यावसाय सुलभीकरण आणि मेक इन इंडिया यासाठी असलेल्या सरकारच्या कटिबद्धतेसाठी आयुष मंत्रालयाने उचललेले हे पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1564286) Visitor Counter : 162


Read this release in: English