पंतप्रधान कार्यालय
हरियाणातील कुरुक्षेत्र येथे पंतप्रधानांची उद्या भेट
महत्वाच्या विकासात्मक प्रकल्पांचे अनावरण
झाजर येथील भाडसा राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
राष्ट्रीय आयुर्वेदीक संस्था पंचकुलाच्या कोनशिलेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
11 FEB 2019 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 फेब्रुवारी 2019 रोजी हरियाणा येथील कुरुक्षेत्र येथे भेट देणार असून, स्वच्छ शक्ती 2019 यामध्ये ते सहभागी होतील. तसेच हरियाणा येथील विविध विकासात्मक प्रकल्पांची कोनशिला ठेवून त्याचे उद्घाटन करतील.
स्वच्छ शक्ती 2019 :
पंतप्रधान स्वच्छ शक्ती 2019 मध्ये सहभागी होऊन स्वच्छ शक्ती 2019 पुरस्कारांचे वितरण करतील. ते कुरुक्षेत्र येथे स्वच्छ, सुंदर शौचालय प्रदर्शनीला भेट देतील आणि सार्वजनिक सभेला संबोधित करतील. देशभरातील जवळपास 15 हजार महिला पंच आणि उपसरपंच या राष्ट्रीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्तीला गुजरात येथे गांधीनगर येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरुवात करण्यात आली. दुसरी आवृत्ती उत्तरप्रदेश येथील लखनौमध्ये 2018 साली भरवण्यात आली असून, 2019 चा स्वच्छ शक्ती कार्यक्रम महिलांना प्रोत्साहनाच्या दृष्टीने कुरुक्षेत्र येथे भरवण्यात येणार आहे.
विकासात्मक प्रकल्प:
झाजर मधील भाडसा येथे राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचे लोकार्पण. एम्स झाजरच्या कॅम्पस क्षेत्रात तिसरे कॅन्सर काळजीवाहू आणि संशोधन संस्था ‘राष्ट्रीय कर्करोग संस्था’ बांधण्यात आली असून, या रुग्णालयात 700 बेड्सची व्यवस्था आहे. तसेच कॅन्सर रुग्णांची काळजी घेणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्स यांच्यासाठी होस्टेल, सर्जिकल, वैद्यकीय, रॅडियेशन ऑनकोलॉजि परिहारक काळजी आणि आण्विक औषधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय कर्करोग संस्था झाजर येथे संशोधन आणि विकास, मॉलिक्युलर बायोलॉजिमधील संशोधन, जिनोमॅक्स, प्रोटोमिक्स, कॅन्सर रोग परिस्थिती विज्ञान ही क्षेत्र प्राथमिकतेवर संशोधनासाठी राहतील.
ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, फरिदाबादचे उद्घाटन:
510 खाटा असलेल्या रुग्णालयात विविध सोयी असून, ईएसआयसी हे रोजगार आणि श्रम मंत्रालयांतर्गत सामाजिक सुरक्षेची तरतूद लाभार्थ्यांना करते.
पंचकुला येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेच्या कोनशिला समारंभ:
पंचकुला येथील श्री माता मनसादेवी मंदिर कॉम्लेक्स येथे राष्ट्रीय आयुर्वेदीक संस्था उभारण्यात आली असून, राष्ट्रीय पातळीवरील आयुर्वेदीक उपचार, शिक्षण आणि संशोधनाची सोय असलेली संस्था राहिल.
कुरुक्षेत्र येथील श्रीकृष्ण आयुष विद्यापीठाचे उद्घाटन:
भारतीय उपचार पद्धती असलेली हरियाणातील श्रीकृष्ण आयुष विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे.
पानिपतच्या ‘बॅटल्स ऑफ पानिपत म्युझियम’ची आधारशिला:
हे संग्रहालय पानिपतच्या युद्धात शहिद झालेल्या योद्धांना अभिवादन म्हणून बनवण्यात येणार आहे.
कर्नाळ येथे आरोग्य विज्ञान पंडित दिनदयाळ उपाध्याय विद्यापीठाचा कोनशिला समारंभ:
पंतप्रधानांच्या हस्ते कर्नाळ येथे आरोग्य विज्ञान पंडित दिनदयाळ उपाध्याय विद्यापीठाचा कोनशिला समारंभ होणार आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक सोयी हरियाणाला प्रोत्साहन देतील.
B.Gokhale/D. Rane
(Release ID: 1564110)
Visitor Counter : 74