पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांची कर्नाटकमधील हुबळी येथे भेट


1.5 एमएमटी मंगलोर एसपीआर आणि 2.5 एमएमटी पादुर एसपीआय यांची पंतप्रधानांनी ठेवली कोनशिला

Posted On: 10 FEB 2019 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एकदिवसीय आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या दौऱ्यातील शेवटचा टप्पा कर्नाटकातील हुबळी येथे भेट देऊन पूर्ण केला. हुबळीच्या गब्बूर येथे त्यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

भारतीय तंत्रज्ञान संस्था, धारवाड आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था धारवाड या दोन संस्थांच्या कोनशिलांचे पंतप्रधानांनी बटन दाबून अनावरण केले.

नागरी वायू वितरण प्रकल्प (सीजीडीपी) धारवाड हा यावेळी राष्ट्राला अर्पण केला. नागरीकांना स्वच्छ इंधन उपलब्ध व्हावे, यासाठी देशभरातील, स्वच्छ इंधनात वाढ करण्यासाठी नागरी वायू वितरण नेटवर्क विस्तारीत करण्यावर सरकार जोर देत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

ऊर्जा सुरक्षा मिळण्यासाठी मंगलोर येथे आयएसपीआरएलच्या 1.5 एमएमटी धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह (एसपीआर) सोयी आणि 2.5 एमएमटी पदूर एसपीआर सोयींचे त्यांनी लोकार्पण केले.

पंतप्रधान मोदी यांनी चिकजाजूर-मायाकोंडा विभाग या 18 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरणाचे त्यांनी लोकार्पण केले. चिकजाजूर-मायाकोंडा विभाग हा हुबळी-चिकजाजूर दुहेरी प्रकल्पाचा 190 किलोमीटर लांबीचा एक भाग असून, तो दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गावर बंगळूर-हुबळी स्थित आहे. या दुपदरीकरणामुळे बंगळूरु ते हुबळी, बेलागावी, गोवा, पुणे, मुंबई या महत्वाच्या मार्गांवरील वाहतूक क्षमता वाढणार असून, रेल्वेच्या सोयींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

सर्वांसाठी घरे या पंतप्रधानांच्या आश्वासनाच्या आधारे धारवाड येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2350 घरांची बांधणी करण्यात येऊन लाभार्थी ई-गृहप्रवेश करतांना पंतप्रधान साक्षीदार होते.

 

 

B.Gokhale/D. Rane

 

 



(Release ID: 1564106) Visitor Counter : 105


Read this release in: English