पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूतल्या तिरुपूरला पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
10 FEB 2019 6:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2019
तामिळनाडूतल्या तिरुपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.
तिरुपूरमधल्या पेरुमन्नलूर इथे पंतप्रधान विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. तिरुपूरमध्ये एसआयसी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. 100 खाटांच्या या रुग्णालयामुळे एक लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवांचा लाभ मिळणार आहे.
चेन्नई इथल्या ईएसआयसी रुग्णालयाचे लोकार्पण त्यांच्या हस्त झाले.
त्रिची विमानतळाच्या नव्या एकीकृत इमारतीचे आणि चेन्नई विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी पंतप्रधानांनी भूमीपूजन केले.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे एन्नोर किनारी टर्मिनल पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण केले. चेन्नई बंदर ते चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मनाली तेलशुद्धीकरण कारखान्यापर्यंतच्या नव्या क्रुड ऑईल पाईप लाईनचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले.
B.Gokhale/N.Chitale/D. Rane
(रिलीज़ आईडी: 1564054)
आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English