मंत्रिमंडळ

शेती व्यवसाय वातावरण सुधारणा आणि परस्पर सहकार्य स्थापन करण्यासाठी भारत आणि मालदीव यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 FEB 2019 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालय आणि मालदीवच्या मत्स्यपालन, सागरी संसाधन आणि कृषी मंत्रालय यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. मालदीव राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान  17 डिसेंबर  2018 रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या करारामुळे कृषि गणना, कृषि उद्योग, एकात्मिक कृषि प्रणाली, सिंचन , प्रगत बियाणे, मृदा आरोग्य व्यवस्थापन , संशोधन, स्‍थानीक कृषी उद्योगाची क्षमता निर्मिती , अन्न सुरक्षा आणि पोषण क्षेत्रातील उद्योजकांचे ज्ञान वाढवणे, हवामानानुसार कृषी व्यवस्था विकसित करणे कीटकनाशकांच्या अवशेषांची तपासणी करण्यासाठी सुविधा निर्माण करणे आदी क्षेत्रात उभय देशांदरम्यान परस्पर सहकार्य वाढण्यात मदत होईल.

या करारांतर्गत सहकार्य योजना तयार करणे, पक्षांनी ठरवलेल्या कामांची अंमलबाजवणी यासाठी एक संयुक्त कृतीगट स्थापन केला जाईल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 



(Release ID: 1563175) Visitor Counter : 137


Read this release in: English