अंतराळ विभाग

फ्रेंच गयाना येथे जी सॅट-31 या भारताच्या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

प्रविष्टि तिथि: 06 FEB 2019 1:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2019

 

फ्रेंच गयाना येथून आज पहाटे जी सॅट-31 भारताच्या अत्याधुनिक संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. फ्रेंच गयानाच्या कौरो प्रक्षेपण तळावरुन भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 2 वाजून 31 मिनीटांनी एरियन-5 व्हीए-247 या प्रक्षेपण यानाद्वारे भारताचा जी सॅट-31 आणि सौदीचा एक तर हेलासचे चार उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

जी सॅट-31 या उपग्रहाचे वजन 2536 किलोग्रॅम असून यामुळे डीटीएच दूरचित्रवाणी सेवा, एटीएमसाठी व्हीसॅट जोडणी आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत तसेच भारताला आणि आसपासच्या बेटांना या उपग्रहामुळे संचारसेवा उपलब्ध होतील असे इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीव्हन यांनी म्हटले आहे.

 

N.Sapre/S.Kane/P.Malandkar

 


(रिलीज़ आईडी: 1562797) आगंतुक पटल : 219
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English