गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
प्रधानमंत्री आवास योजना, नागरी अंतर्गत 4,78,670 घरांना मंजुरी
महाराष्ट्रासाठी 17,817 घरांना मंजुरी
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2019 4:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2019
शहरी भागातील गरीबांसाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4,78,670 घरांना मंजुरी देण्याच्या प्रस्तावाला आज गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने मंजुरी दिली. केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या 42 व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत नागरी भागात 72,65,663 घरांना मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी या अंतर्गत 17,817 घरं मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत एकूण 940 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पांसाठी 22,492 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी केंद्र सरकारकडून 7,180 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1562078)
आगंतुक पटल : 148
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English