सांस्कृतिक मंत्रालय
नोएडा येथे बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालय संस्थेचे उद्या प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
29 JAN 2019 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2019
उत्तर प्रदेशात नोएडा येथे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालय संस्थेचे उद्घाटन उद्या मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्री आणि या संस्थेचे कुलगुरू डॉ. महेश शर्मा हेही यावेळी उपस्थित राहतील.
देशातील कला आणि सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास तसेच संशोधन करण्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या संस्थेत कला पदव्युत्तर शिक्षणासाठी कला, संवर्धन आणि संग्रहालय शास्त्र या विषयात पीएचडी संशोधन करता येणार आहे.
या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला असून सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे. याआधी या संस्थेचे कामकाज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या इमारतीतून चालत असे. मात्र, कालांतराने या संस्थेच्या स्वत:च्या इमारतीसाठी नोएडा येथे जागा देण्यात आली. तसेच 90 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यानुसार ही इमारत बनवण्यात आली आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1561782)
Visitor Counter : 132