अंतराळ विभाग

पीएसएलव्ही-सी 44 कडून मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅट-व्ही 2 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

प्रविष्टि तिथि: 25 JAN 2019 6:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2019

 

पीएसएलव्ही-सी 44 द्वारे मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅट-व्ही 2 हे उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले.

उड्डाणानंतर सुमारे 13 मिनिटे 26 सेकंदांनी मायक्रोसॉफ्ट-आर 274 किमीवरच्या कक्षेत स्थापित करण्यात आला. त्यानंतर 453 किलोमीटरच्या कक्षेत कलामसॅट-व्ही 2 स्थापित करण्यात आला.

कलामसॅट-व्ही 2 विद्यार्थ्यांनी तयार केला आहे.

ही मोहीम वैशिष्ट्यपूर्ण होती, असे इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी प्रक्षेपणानंतर सांगितले. उपग्रहनिर्मितीतील अचुकतेबद्दल त्यांनी कलामसॅट-व्ही2 चमूचे अभिनंदन केले. इस्रोकडून देण्यात येत असलेल्या संधीचा विद्यार्थी लाभ घेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1561460) आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English