मंत्रिमंडळ

दिल्ली मेट्रो मार्गाच्या दिलशाद गार्डन ते न्यू बस अड्डा गाझियाबाद विस्तारीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2019 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो मार्गाच्या दिलशाद गार्डन ते न्यू बस अड्डा गाझियाबाद विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे. या विस्तारित मार्गाचे एकूण अंतर 9.41 किमी असेल. विस्तारीकरणाचा एकूण खर्च 1,781.21 कोटी रुपये असून यासाठी 324.87 कोटी रुपये केंद्रीय अर्थसहाय्य द्यायला देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे NCRला आवश्यक अतिरिक्त सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होतील.

 दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेडनेही  केंद्र सरकार आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकारची विशेष उद्देशासाठी स्थापन कंपनी (SPV)  या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे.

 

 

S.Tupe/S.Kane/D. Rane

 


(रिलीज़ आईडी: 1561154) आगंतुक पटल : 117
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English