पंतप्रधान कार्यालय

दादरा नगर हवेलीला पंतप्रधान उद्या भेट देणार


अनेक विकास प्रकल्पांचेही करणार उद्‌घाटन

Posted On: 18 JAN 2019 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दादरा नगर हवेलीची राजधानी सिल्व्हासाला भेट देणार आहेत.

आपल्या दौऱ्यात पंतप्रधान सायली इथे वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमीपूजन करतील. दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली इथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटनपर पट्टिकेचे अनावरण पंतप्रधान करणार आहेत.

एम आरोग्य ॲपचे पंतप्रधान उद्‌घाटन करतील त्याचबरोबर दादरा नगर हवेलीत घरा-घरातून कचरा गोळा करुन, त्याचे पृथक्करण करणे आणि घनकचऱ्यावरच्या प्रक्रियेचे पंतप्रधान डिजिटल उद्‌घाटन करतील.

केंद्र शासित प्रदेशाचे माहिती तंत्रज्ञान धोरणही पंतप्रधान जारी करतील.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि वन हक्क लाभार्थींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रशस्तीपत्रांचे वाटप केले जाईल.

सिल्व्हासा इथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आल्यानंतर दादरा, नगर हवेली तसेच दमण आणि दीवसह आजुबाजुच्या परिसरात आरोग्य सुविधा वाढणार आहेत. दोनही केंद्रशासित प्रदेशांच्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होणार आहे. यामुळे डॉक्टरांची उपलब्धता वाढणार असून, विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण सुविधाही अधिक उपलब्ध होणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय, निमवैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे आणि निवासी इमारतीसाठी 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

 

N.Sapre/N. Chitale/D. Rane

 

 



(Release ID: 1560593) Visitor Counter : 64


Read this release in: English