पंतप्रधान कार्यालय

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून त्यांचे स्मरण

प्रविष्टि तिथि: 12 JAN 2019 1:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले.

पंतप्रधान म्हणाले की, ‘उठा, जागे व्हा, उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी त्यांच्या या समृद्ध विचारांचे स्मरण करत त्यांनी सेवा आणि त्यागाच्या मुल्यांवर भर दिला. युवा शक्तीवरचा त्यांचा विश्वास अद्‌भुत होता.

स्वामी विवेकानंद यांच्या विचार आणि आदर्श मूल्ये कोट्यवधी भारतीयांना विशेषत: आपल्या युवकांना प्रेरणा आणि ऊर्जा देतात. त्यांच्याचकडून आपण मजबूत, सर्वसमावेशक आणि अनेक क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणाऱ्या भारताची निर्मिती करण्यासाठी प्रेरणा घेतली आहे.’

 

 

S. Tupe/ S. Kane/D. Rane

 


(रिलीज़ आईडी: 1559699) आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English